आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जी आजकाल सर्वसामान्य झाले आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होतो ती गोष्ट म्हणजे अनिद्रा.
आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही, किंवा झोपेत अचानक जाग येते. म्हणून रात्री झोप व्यवस्थित न झाल्यास आपला पूर्ण दिवस अतिशय चिडचिडेपणामध्ये व कंटाळवाणा जातो व दिवसा झोप आल्यासारखे वाटते. तर काही जणांची नाईट ड्युटी असल्यामुळे त्यांची झोप होत नाही. तर या सर्व समस्यांबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगण्यात आले आहे ते आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
झोपेचे महत्व, झोपेचे प्रकार, झोप न येण्याची कारणे, कमी झोपल्यानंतर होणारे दुष्परिणाम, जास्त झोपल्यास त्याचे शरीराला होणारे तोटे, झोपेमधील अनियमितता, दिवसा कोण झोपावे व कोण झोपू नये याबद्दल आयुर्वेदामध्ये आचार्य चरक आणि आचार्य वागभट्ट यांनी अतिशय सविस्तर असे वर्णन केलेले आहे ते आपण आज या ब्लॉगमध्ये पाहू म्हणून सर्वांनी ब्लॉक शेवटपर्यंत नक्की वाचा.
आहारशयनाब्रह्मचर्यैर्युक्त्या प्रयोजितैः । शरीरं धायति नित्यमागारमिव धारणैः ।। – अष्टांगहृदय सुत्रस्थान ७ / ५२
ज्याप्रकारे घर हे पिलर वरती स्थिर उभे राहतील तसेच आपल्या शरीरासाठी आहार झोप आणि निद्रा या तीन गोष्टींमुळे आपले शरीर भक्कम आणि स्वस्थ होते.

आचार्य चरक यांनी झोपेचे खालील सहा प्रकार सांगितले आहेत
तमोभवा श्लेष्मसमुद्भवा च मनः शरीरश्रमसम्भवा च ।
आगन्तुकी व्याध्यनुवर्तिनी च रात्रिस्वभावप्रभवा च निद्रा ॥ ५८ ॥ रात्रिस्वभावप्रभवा मता या तां भूतधात्रीं प्रवदन्ति तज्ज्ञाः । तमोभवामाहरघस्य मूलं, शेषाः पुनर्व्याधिषु निर्दिशन्ति’ ।। ५९
चरक संहितेमध्ये आचार्य चरक यांनी सांगितल्याप्रमाणे झोपेचा पहिला प्रकार आहे तमोभवा निद्रा, या प्रकाराची झोप ही आपल्या शरीरात तामसिक भाव जास्त झाल्यामुळे येते. ही सर्वात निकृष्ट अशी झोप असते.
त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो श्लेष्मसमुद्भवा निद्रा, या प्रकारची निद्राही शरीरात कफदोष वाढल्यामुळे निर्माण होते. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे शरीर आणि मन हे दोन्हीही थकल्यामुळे येणारी झोप, त्यानंतर चौथा प्रकार आहे एखाद्या गोष्टीचा सुवास आल्यामुळे येणारी झोप, त्यानंतरचा प्रकार आहे कुठल्यातरी आजारामुळे येणारी झोप आणि सर्वात शेवटीचा प्रकार आहे तो म्हणजे रात्री स्वभाविकरीत्या आलेली झोप. आणि या प्रकाराची झोप ही सर्वोत्कृष्ट मानली जाते.
चरक संहितेमध्ये झोपेबद्दल खालील प्रमाणे वर्णन येते.
निद्रायत्तं सुखं दुःखं पुष्टिः कार्श्य बलाबलम् । वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च ।।
अकालेऽतिप्रसङ्गाच्च न च निद्रा निषेविता । सुखायुषी पराकुर्यात् कालरात्रिरिवापरा ।।
याचा अर्थ असा की निद्रा जर योग्य प्रमाणात असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्य, सुदृढता, बल बुद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. पण जर झोप व्यवस्थित नसेल तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग, कृशता, निर्मलता तसेच नपुंसकता हे आजार होऊ शकतात आणि जीवनाचा नाश होतो.
जर अवेळी झोप घेतली तर किंवा जास्त वेळ झोप घेतली तर किंवा खूप कमी झोप घेतली तर या अशा चुकीच्या वर्तनामुळे आपले आयुष्य आणि आरोग्य नष्ट होते.

रात्री जागरण आणि दिवसा झोप
रात्रौ जागरणं रूक्षं, स्निग्धं प्रस्वपनं दिवा ॥ ५५ ॥
अरूक्षमनभिष्यन्दि त्वासीनप्रचलायितम् ।
महर्षी वागभट्ट आपल्या अष्टांगहृदय या ग्रंथात असे लिहितात की रात्री जागरण केल्याने शरीरात रुक्षता येते व वात दोष वाढतो आणि दिवसा झोपल्यामुळे शरीरामध्ये स्निग्धता वाढते, असे होण्याचे मूळ कारण आपल्या शरीरामध्ये कफ दोषाची वाढ होते. यामध्ये अजून एक प्रकारची झोप असते बसल्या बसल्या डुलकी घेणे या प्रकारच्या झोपेमुळे शरीरामध्ये वृक्षतही होत नाही आणि कफ वृद्धी होत नाही.
चरक संहितेमध्ये महर्षी चरक दिवसा झोपण्याबद्दल खालील प्रमाणे वर्णन करतात.
ग्रीष्म ऋतू मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात वृक्ष शरीर असलेल्या व्यक्ती मध्ये वात वाढलेला असतो तसेच रात्र लहान असल्यामुळे दिवसा झोप येणे उत्तम असते.
ग्रीष्म ऋतू सोडून इतर कुठल्याही ऋतूमध्ये दिवसा झोपल्याने कफ आणि पित्त यांचा प्रकोप होतो म्हणून ग्रीष्म ऋतू सोडून इतर कुठल्याही ऋतूमध्ये दिवसा झोपू नये. अतिशय जाड व्यक्ती, कफ प्रकृतीच्या व्यक्ती, जे स्निग्ध पदार्थांचे सेवन जास्त करतात, किंवा विषबाधा झालेला व्यक्ती यांनी कुठलेही ऋतूमध्ये दिवसा झोपू नये.

दिवसा झोपल्यामुळे होणारे नुकसान/तोटे
दिवसा झोपल्यामुळे वारंवार ताप येणे, खोकला, सर्दी, व्यवस्थित पचन न होणे, शरीर अतिशय जड जड वाटणे, शरीरामध्ये वेदना होणे, स्मृतिनाश, अर्धशिशी, अंगावर चट्टे येणे, फुंसी येणे, त्वचेला खाज सुटणे, घशाचे आजार होणे, इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे यासारखे अनेक आजार होतात त्यामुळे बुद्धिमान व्यक्तीने आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची निवड करून आपल्यासाठी जे हितकारक आहे असाच निर्णय घ्यावा.
दिवसा कोण झोपावे 👇🏻
जे व्यक्ती गायनामुळे, वाचन केल्यामुळे, शक्ती पूर्वक अति जास्त काम केल्यामुळे, जास्त वजन उचलल्याने, जास्त चालल्याने क्षिण झाले आहेत, ज्या व्यक्तींना अजीर्ण आहे, ज्यांचे शरीर क्षीण आहे, जे अतिसाराने ग्रसित आहेत, अशा सर्व व्यक्तींनी दिवसा झोपायला हवे.
श्वास विकार असणारे, ज्यांना उचकी सारखे लक्षणे आहेत, जे व्यक्ती उंच ठिकाणाहून खाली पडले आहेत, ज्यांना जखम झाली आहे, जे व्यक्ती रात्री जागरण केल्यामुळे थकले आहेत, ज्यांना राग भीती आणि शोक अनावर झाला आहे तसेच ज्यांना दिवसा झोपण्याची सवय लागली आहे अशा सर्व व्यक्ती कोणत्याही वेळी दिवसा झोपू शकतात.
खुपच छान माहिती दिली!
Khup Chan mahiti aahe
Mala pan same problem aahe
Ajun mahiti share karat ja
सुंदर लेख माहिती ,कृपया मला मेलवर पाठवू शकाल का ?
माझा मेल आय.डी . vbj@ceraflux.com
आहे
Dream zop yete
रात्री झोप 2-3 पर्यंत गत नाही. या वर औषधे कोणती घ्यावीत.