आपण आयुष्यभर चुका करत राहतो आणि नंतर आपला आजार नीट करण्यासाठी धावपळ पैसा आणि सर्वस्व व्यर्थ घालतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये याची आपण जर काळजी घेतली तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.
नमस्कार आरोग्यनिती ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो आजकाल आपली जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच पाहिजे असते आता पहा ना जर आपल्याला भूक लागलेली असेल आणि जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ नसेल किंवा थकवा जाणवत असेल तर आपण लगेच काहीतरी फास्टफूड बनवून खातो. काही बनवन्या इतका वेळ सुद्धा नसेल तर आपण जेवण ऑनलाईन ऑर्डर करतो. काही खरेदी करायची असेल तर आपण ते सुद्धा ऑनलाईनच खरेदी करतो, आपल्याला तिथपर्यंत जाऊन खरेदी करण्याचा वेळ सुद्धा आपल्याकडे नाही.
म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण धावपळच करत आहोत. या धावपळीमुळे व अशा दगदगीच्या जीवनशैलीमुळे काय होते तर आपण आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि मग स्वास्थ्य खराब झाल्यानंतर ते दुरुस्त करण्याचा शॉर्टकट शोधत असतो.

मग तिथूनच सुरुवात होते लहान लहान आजारासाठी सुद्धा औषध आणि गोळ्यांवर डिपेंड राहण्याची.
कधी आपल्याला ताप आला लगेच आपण गोळी घेतो, सर्दी खोकला झाला, उलटी झाली जुलाब झाले तर लगेच आपण गोळी घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करतो.
अशा प्रत्येक आजारासाठी आपल्याला वाटते की गोळी घ्यावी आणि आपला आजार लगेच बरा व्हावा. पण आपण या गोष्टीचा विचार करत नाही की आपल्या शरीरात ही लक्षणे का आली असावीत, याचे काही ना काही कारण नक्कीच असते जसे की अनियमित दिनचर्या जेवणामध्ये झालेली गडबड झोप व्यवस्थित न झाल्यास, अशी अनेक कारणे असू शकतात.
आता एक गोष्ट लक्षात घ्या एक तर आपल्या चुकीमुळे आपले शरीर आजारी पडले आहे, आणि तो आजार बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्या शरीर करत असते परंतु आपण गोळी खाऊन तो आजार आपल्या शरीरातच दाबून ठेवतो, जसे की काही चुकीचा आहार घेतल्यामुळे आपल्याला उलटी होत असेल तर शरीरात तयार झालेले टॉक्सिन्स शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि आपण गोळी घेऊन ते टॉक्सिन्स आपल्या शरीरातच दाबून ठेवतो.परिणामी या लहानशा आजाराचे रूपांतर हळूहळू मोठ्या आजारात होते.

याचबरोबर जीवनशैलीमध्ये झालेला खूप मोठा बदल बैठी जीवनशैली आहारात झालेला बदल दिनचर्या मध्ये झालेला बदल इमोशनल स्ट्रेस ताण तणाव विनाकारण धावपळ या गोष्टी जर वर्षानुवर्ष चालू राहिल्या तर आपल्याला बीपी शुगर थायरॉईड कॅन्सर मानसिक विकार यासारखे आजार झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग आपल्याला या आजारासाठी गोळ्या औषधांवर अवलंबून राहावे लागते, एक वेळ अशी येते की गोळ्या औषधाने सुद्धा हे आजार कंट्रोलमध्ये राहत नाहीत मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला असतो की आता तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल.
हा ब्लॉक लिहिण्यामागे माझे एवढेच तात्पर्य आहे की आपण आयुष्यभर चुका करत राहतो आणि नंतर आपला आजार नीट करण्यासाठी धावपळ पैसा आणि सर्वस्व व्यर्थ घालतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये याची आपण जर काळजी घेतली तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.
आचार्य चरक म्हणतात –
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम् |
मानं च तच्य यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते ||
म्हणजेच आपल्या जीवनासाठी काय चांगले आहे किंवा काय वाईट आहे.आपल्या साठी सुखकारक काय आहे आणि दुःखदायक काय आहे. या प्रश्नांची उत्तरे ज्या शास्त्रामध्ये आहेत ते म्हणजे आयुर्वेद होय.
स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातूरास्य विकरप्रशमनं च ||
म्हणजेच जे स्वस्थ आहेत, ज्यांना कोणताही आजार नाही त्याच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आयुर्वेदाचा प्रमुख उद्देश आहे.
म्हणून दिनचर्या ऋतुचर्या योग्य आहार विहार व्यवस्थित झोप व्यायाम या गोष्टींचा समन्वय साधल्यास आजार आपल्याजवळ देखील भटकणार नाही. आणि समजा आजार झालाच तर त्यासाठी उपचार सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत
Very nice & useful tip .👏👏🙏🙏
चांगली माहिती दिली आहे
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती . सर्वानी याचे अनुकरण करावे .
Khup chhan mahiti aahe
आरोग्या बद्यल उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद
खुपच छान माहिती दिली आहे.
खूपच छान माहिती
खूप छान.
अगदी बरोबर ! रोग होऊच नये म्हणून योग्य तो आहार वेळेवर घ्यावा .
Correct
खुप छान माहिती आहे
Excellent information
अगदीच खरं आहे एकदम भारी योग्य सल्ला दिला योग्य मार्गदर्शन केले आनी धन्यवाद
खरे आहे
पण आपल्याला कळते पण वळत नाही
आपल्या शरीरांतर्गत आणी मनीकड्े दुर्लक्ष करतो विशेषतः स्त्रिया
घरातल्यासर्वांची कांळजी घेतात पण स्वतः कडे बघायला वेळच नाही
खुपच छान माहिती दिली!
Nice information 👌
Khup Chan mahiti